अभिनयानंतर राजकारणात आपली नवीन इनिंग सुरु करू पाहणारे सुप्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी एका साप्ताहिकात स्फोटक लेख लिहिला आणि या लेखाची सर्वत्र चर्चा होवू लागली. तमिळ भाषेतील ‘आनंद विकटान ‘ या साप्ताहिकात त्यांनी हिंदू दहशतवाद अस्तित्वात नाही, अस कोणीच म्हणणार नाही. यापूर्वी हिंदुत्वाचा चर्चा करण्यावर विश्वास असायचा. पण आता ते हिंसाचारातही सहभागी होवू लागले आहेत. या लेखावर तामिळनाडूत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर आता सोशल मिडीयावर 4 वर्षाच्या मुलाचा एक व्हिडीओ पाहून ते अस्वस्थ झाले आहेत. हा व्हिडीओ शेअर करतांना त्यांनी दुःख व्यक्त केले. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा कमल हसन यांचे पोस्टर चाकूने फाडतांना दिसतोय. धोतर नेसलेल्या या लहान मुलाच्या कपाळावर विभूती पाहायला मिळतेय. हा मुलगा पोस्टर फाडत असतांना मागून एक व्यक्ती त्याला पोस्टर फाडण्यासाठी भडकावत आहे. हा माणूस हिंदू विरोधी आहे, अस तो तमिळ भाषेत त्या लहान मुलाला सांगतोय.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews